Gondi Sanskrutiche Sandarbh

300.00

Category:

प्रकरण पहिले गोंडी संस्कृतीचा वारसा : गळ्या, उत्खनन्, किल्ले “महेंजोदारो हरप्पा संस्कृती म्हणजे भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेले एक पान आहे.” असे गौरवपूर्ण उद्गार पं. जवाहर लाल नेहरूंनी प्रियदर्शिनी इंदिरेस लिहिलेल्या एका पत्रात काढलेले आहेत. महेंजोदारो हरप्पाच्या उत्खननामुळे भारतीय इतिहासाला ५००० वर्षाचा अत्यंत प्राचीन असा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे त्यास जागतिक महत्वही प्राप्त झाले आहे. महेंजोदारो-हरप्पा प्रमाणेच राजस्थानमधील कालीबंगन, कच्छ मधील कोटा आणि सौराष्ट्रातील लोथल येथेही तेवढेच प्राचीन अवशेष उपलब्ध झालेले आहेत, ऐतिहासिक दृष्ट्या वरील सर्व उत्खननात समान वैशिष्ट्ये आढळून आल्यामुळे त्या सर्वास सैंधवी संस्कृतिचे नावाने ओळखले जाते. सिंधु नदीच्या विशाल खोऱ्यामध्ये महेंजोदारो-हरप्पा ही मोठमोठी नगरे जमीनीत गडप झालेली आढळून आलीत. तशीच नगरे जुन्या सरस्वती नदीच्या पात्रातही गडप झालेली आढळून आलीत, त्या सर्वांतील शिल्प, कला आणि अवशेष, वस्तूंमधील कमालीच्या साधर्म्यामुळे त्यांना ते नाव देण्यात आलेले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gondi Sanskrutiche Sandarbh”

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat Icon